मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (jawan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. किंग खानच्या (king khan) या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. ऍटली कुमार (Atlee offer hollywood) दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीज होताच अनेक मोठ्या चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. अलीकडेच दिग्दर्शक ऍटलीने खुलासा केला की, ‘जवान’ नंतर त्याला हॉलिवूडमधून फोन येऊ लागले.
एका मुलाखतीत ऍटली यांनी सांगितले की, ‘प्रेमाशिवाय जगात काहीही नाही. माझ्या कामात कोणतेही गणितीय सूत्र नाही. माझे कामवर पूर्णपणे प्रेम आहे. मला एखादी गोष्ट आवडत नसेल तर मी त्यात पूर्ण योगदान देऊ शकत नाही. कोणतेही काम करण्यासाठी त्यावर प्रेम करायला हवे असे ऍटली म्हणतो.
ऍटली पुढे म्हणाले, ‘जर मी चित्रपट बनवत असेल तर मला केवळ नायकच नाही तर निर्मात्यावरही विश्वास ठेवावा लागतो. त्यातून प्रामाणिकपणा प्रेमासोबत येतो. मी माझा वेळ लोकांसोबत घालवतो आणि पाहतो की आपण खरोखर मिसळतोय का आणि त्यांच्याकडून काही शिकू शकतो का ? असं ऍटलीम्हणाला.
हॉलिवूडमधून (hollywood) आलेल्या कॉलचे वर्णन करताना ऍटली म्हणाला, ‘आमच्या चित्रपटात काम करणारे लोक हॉलिवूडचे होते. अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रझाटोस यांनी आमच्यासोबत काम केले. स्पिरो आणि इतर महान हॉलिवूड दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ जवानाच्या त्याच स्क्रिनिंगला होते. ते मला म्हणाले, ‘तुला हॉलिवूडमध्ये काम करायचे असेल तर आम्हाला कळव.’ मला वाटले की ही कल्पना केवळ आमच्यासाठी कार्य करते, परंतु ते कार्य जागतिक स्तरावर घडत आहे.
शाहरुख खान, (srk) नयनतारा (Nayantara) आणि विजय सेतुपती स्टारर ‘जवान’ 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार करेल. जवान या चित्रपटाची निर्मिती गौरी खानने रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत केली आहे.