India vs Australia 2ND ODI Score Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिलनेही शतक झळकावल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. त्याने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. तर श्रेयसने 90 चेंडूत 105 धावांची खेळी केली. शुभमन आणि श्रेयसमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी झाली.
सध्या कर्णधार केएल राहुल 43*(26) आणि इशान किशन 25*(16) क्रीजवर असून भारताची धावसंख्या 40 षटकात 3 बाद 296 इतकी झाली आहे.
गिलचे सहावे शतक…
श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुभमन गिलचाााही जलवा पाहायला मिळाला. त्याने 92 चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे तर एकूण नववे शतक झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे.
अय्यरचे तिसरे शतक
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 86 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले आहे.