कोंढवा, दि. 15 (प्रतिनिधी) -एक जागरुक लोकप्रतिनिधी या नात्याने ऍड. हाजी गफुर पठाण यांचे नेहमीच कोंढवा परिसरातील नागरिकांच्या हितासाठी सामाजिक कार्य सुरू असते, असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी केले.
कोंढवा खुर्द-मिठानगर भागाचे माजी नगरसेवक ऍड. हाजी गफुर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त बालमेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी आमदार चेतुन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते ऍड. हाजी गफुर पठाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी आमदार तुपे बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न असो की गणेशोत्सवात पुण्याची संस्कृती जपण्याचा विषय असो, पुण्यनगरीतील प्रत्येक प्रश्नांत सक्रियपणे सहभागी होत जागरूक लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणारे गफुरभाई यांच्या आम्ही कायम पाठीशी उभे राहु.
वाढदिनी सन्मानानंतर बोलताना माजी नगरसेवक ऍड. हाजी गफुर पठाण म्हणाले की, कोंढव्याच्या सर्वांगीण व समतोल विकासासाठी कोणतेही मतभेद न करता सर्वधर्मीयांना सोबत घेऊन कोंढव्याचे नंदनवन केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.
यावेळी आयोजन करण्यात आलेल्या बालमेळाव्यामध्ये लहान मुलांची विविध प्रकारची खेळणी, मनोरंजनाचे साहित्य असल्याने लहान मुलांची आपल्या पालकासमवेत मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेविका नंदा लोणकर, माजी नगरसेवक रईस सुंडके, हसीना इनामदार, माजी स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, मोहम्मंदीन खान, इम्तियाज शेख, तब्बसूम शेख, आबिद सय्यद,मजहर मणियार, आसिफ पटेल, बाप्पू मुलाणी आदि उपस्थित होते.