शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी शौर्यदिनी ऐतिहासिक विजय रणस्तंभास मानवंदाना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगच्या ठिकाणाहून ने- आण करण्यासाठी ठेवलेल्या बसेस कमी पडल्याने गर्दी वाढली. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. मोठी कसरत करावी लागली आहे.
मागील वर्षी प्रशासनाने प्रथमच सर्व कार्यक्रम हाती घेतला होता. त्यावेळी काही बसेस कमी पडल्याने पोलीस वाहन वापरण्याची वेळ आली होती. यावर्षी बसेसची संख्या वाढविली होती. परंतु दुपारी नागरिकांची गर्दी प्रचंड वाढल्यामुळे अचानक बस कमी पडल्या. परंतु प्रशासनाने जादा बसेसची सोय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची गर्दी कमी झाली. त्यानंतर गर्दी आटोक्यात आणण्यात यश आले.