सासवड -पुरंदर तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून आज तालुक्यातील एकूण रुग्ण संख्येत तीनने वाढ झाली. पुरंदर तालुक्यातील माहूर येथे मुंबईहुन आलेल्या एका मध्यमवयीन महिलेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काल सासवड शहरातील पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
त्याचबरोबर सासवड शहरातील साळी आळी परिसरातील एका ज्येष्ठ महिलेचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे.