Nada suspends Bajrang Punia – नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) कुस्तीपटू बजरंग पुनियाला अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. बजरंग पुनियाने डोप चाचणीसाठी नमुने दिले नव्हते, त्यामुळे नाडाने ही कारवाई केली आहे. 10 मार्च रोजी, ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आशियाई पात्रता स्पर्धेच्या राष्ट्रीय चाचण्यांदरम्यान, नाडाने बजरंगला त्याचा नमुना देण्यास सांगितले होते. परंतु, बजरंगने नमुना देण्यास नकार दिला. त्यानुसार नाडाने जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीला (वाडा), एका खेळाडूने त्याचा नमुना का सादर न केल्याचे कळवले होते.
यानंतर वाडाने नाडाला बजरंगला 23 एप्रिल रोजी नोटीस बजावून चाचणीस का नकार दिला याचे स्पष्टीकरण 7 मे पर्यंत मागविले होते. त्यास बजरंगने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये बजरंग पुनियाला फ्री-स्टाईल 65 किलो वजनी गटात रोहितने 9-1 ने पराभूत केले होते. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर बजरंग पुनियाने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्र सोडले. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा) च्या अधिकाऱ्यांनी पुनियाचा डोप नमुना गोळा करण्याचा प्रयत्न केला, परंतू पुनियाने तो घेऊ दिला नाही.
चाचणीस कधीही नकार दिला नाही- पुनिया
नाडाच्या कारवाईनंतर बजरंग पुनियाने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली आणि लिहिले, डोप चाचणीसाठी माझ्याबद्दल येत असलेल्या बातम्यांबद्दल मी इतकेच सांगेल, की मी नाडा अधिकाऱ्यांना नमुने देण्यास कधीही नकार दिला नाही. मी केवळ त्यांना नमुना गोळा करण्यासाठी आणलेल्या कालबाह्य झालेल्या किटवर काय कारवाई केली हे विचारले व नंतर डोप चाचणी घ्या, अशी विनंती केली होती. तरी, माझे वकील विदुश सिंघानिया योग्य वेळेत या पत्राला उत्तर देतील, अशी माहितीही पुनियाने यावेळी दिली आहे.