मुंबई – अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे शोबिझच्या जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडत्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. सोशल मीडिया ते नेहमीच पोस्ट्स शेअर करत असतात. पोस्टमध्ये हे जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे नेहमीच कौतुक करत असतात.
#TejaTroops #KKundrraSquad have some shame man..Literally some of you are so pathetic. They are soo happy with each other and you all are making their social media experience unbearable with your constant judging.! Seriously kuch toh Sharam karo and stop this stupidity.! #TejRan pic.twitter.com/fMPh7xcIZ9
— SHARON aka StreamKaroBc 😛 (@streamRDH_Kamle) April 19, 2023
तेजस्वी आणि करण ‘बिग बॉस 15’ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांचे नाते फुलले. त्यांच्या नात्याची सुरुवात भांडणातून झाली, पण हळूहळू त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. बिग बॉस 15 नंतरही तेजस्वी आणि करण त्यांच्या नात्यावर ठाम आहेत अशात आता तेजस्वी रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये हे कपल एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. तेजस्वीच्या शेजारी बसलेला करण कुत्र्यासोबत खेळत आहे. दुसरीकडे, तेजस्वीने करणसोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या भावना स्पष्ट करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
तेजस्वी म्हणते, ‘माझा सध्या चांगला वेळ आहे’ आणि ती बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी येते. करणने प्रेयसी तेजस्वी प्रकाशला रडताना पाहिल्यानंतर तेजस्वीला बरे वाटावे म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले. तेजस्वी करण कुंद्राला सांगताना दिसत आहे, ‘मला चाहत्यांना सांगायचे आहे की मी तुझ्यासोबत किती आनंदी आहे.’ असं म्हणत ती पुन्हा एकदा आपलं प्रेम व्यक्त करते.