पुणे – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री ‘प्रिया बेर्डे’ आता राजकरणात एन्ट्री करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत येत्या ७ जुलै रोजी प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पुण्यातील निसर्ग येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
दरम्यान, यावेळी त्यांच्या सोबत प्रिया बेर्डे, अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडेकर, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलंद अष्टेकर सर्वजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
‘मला पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसेच बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कामाने त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे सारखे वाटते. त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात मला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल’. असं प्रिया बर्डे यांनी प्रसिद्ध एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितलं. दरम्यान, प्रिया बर्डे यांची राजकारणातील एन्ट्री मराठी कलाकारांसाठी अतिशय फायद्याची ठरणार हे नक्की.