मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंहला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिची ही अवस्था पाहून चाहते देखील तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहे.
आरती सिंहने शुक्रवारी इंस्टाग्रामवर रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरवातीला तिची टीव्हीवर मालिका चालू असल्याचे दिसते. त्यानंतर ती बेडवर आराम करत असल्याचे दिसते. यानंतर ती स्माईलही करते. हा व्हिडिओ शेअर करत आरतीने पोस्टमध्ये लिहिले की, ‘हा आठवडा खूपच कठीण होता. काचेचे तुकडे माझ्या हातात घुसल्याने माझी सर्जरी पार पडली.’
’23 एप्रिलला मी माझ्या मित्रमंडळींसोबत जेवायला गेली होती. त्यावेळी माझ्या हातून एक काचेचा ग्लास पडला आणि ते काचेचे तुकडे माझ्या हातात घुसले. काचेचे तुकडे माझ्या हातात घुसल्याने मी लगेचच डॉक्टरांकडे गेले. त्यावेळी मला कळाले की सात काचेचे तुकडे माझ्या हातात घुसले आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करून तुकडे काढले आणि सात टाके घातले आहे.’
View this post on Instagram
आरती सिहं पुढे म्हणाली, ‘माझ्या नव्या मालिकेचा पहिला एपिसोड मला रुग्णालयात पाहावा लागला. आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. माझी मालिका सुरू होताच मला ब्रेक घ्यावा लागला. पण मी वाघीण आहे लवकरच दमदार कमबॅक करेल’, असा विश्वास देखील तिने व्यक्त केला. आरती सिंह सध्या ‘श्रवनी’ या मालिकेत दिसणार असून यात तिने नकारात्मक भूमिका साकारली आहे. याआधी ती ‘बिग बॉस 13’मध्ये देखील दिसली होती.