पुणे शहरातील वसतिगृहांचे होणार अधिग्रहण

2 हजार खाटांची क्षमता उभारण्यासाठी निर्णय

पुणे – करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संख्या पुढील काळात आणखी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरातील 13 महाविद्यालयांची वसतिगृहे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

त्यासाठीचे पत्र पालिकेकडून नुकतेच जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे. ही अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच या इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारले जाणार आहेत. शहरात करोनाची लागन झाल्याचे रूग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. तर परदेशातून आलेले अनेकजण घरीच विलगीकरण कक्षात असले तरी, त्यांना त्रास झाल्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठीची सुविधाही उभारणे आवश्‍यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासन विलगीकरण कक्ष उभारत आहे. पालिकेने आतापर्यंत शहरात सणस मैदान, डॉ. लायगुडे दवाखाना, खराडी येथील क्रीडा संकूल या तीन ठिकाणी कक्ष उभारले असून त्यांची क्षमता 300 ची आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील संचार बंदी उठल्यानंतर तसेच लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील प्रमुख महाविद्यालयांची 13 वसतिगृहे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वसतिगृहांची महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.