पुन्हा बनणार शहंशाह

अमिताभ बच्चन यांना बिग बी, मेगास्टार याप्रमाणे बॉलीवूडचे शहंशाह असेही टोपणनाव आहे. 1988 मध्ये बच्चन यांचा शहंशाह रिलीज झाला होता आणि थिएटरवरती प्रेक्षकांची गर्दी थोपवायला पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागला होता. रिश्‍ते में तो हम तुम्हारे बाप लगते है हा डायलॉग तमाम पब्लिकच्या तोंडी फिट बसला होता.

आता शहंशाहचा हा डायलॉग आणि ऍक्‍शनची ही जादू पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी बच्चन यांच्या फॅन्सना मिळण्याची शक्‍यता आहे. शहंशाह पुन्हा एकदा करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते आहे. शहंशाहचे डायरेक्‍टर टिनू आनंद शहंशाह पुन्हा एकदा करण्याचा विचार करत आहेत. या नव्या शहंशाहमध्ये देखील अमिताभ बच्चन हेच लीड रोल करणार असतील.

जर तसे झाले तर जुन्या ढंगामध्ये नवीन शहंशाह बघायला मिळेल. पहिल्या शहंशाहच्या बजेटबाबत खूप वाद झाले. सिनेमाचे बजेट खूप जास्ती होत असल्याचे लक्षात आले होते. सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेटदेखील रिलीजच्या अगदी काही दिवस आगोदर मिळाले होते. शहंशाहचा रिमेक होणार अशी बातमी 2016 मध्येही पसरली होती. मात्र तसे झाले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.