लास वेगास – न्यायालयाचे कामकाज सुरू असताना एका प्रतिवादीने थेट न्यायाधीश महिलेवर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार आज क्लार्क कौंटी डिस्ट्रीक्ट कोर्टामध्ये घडला. महिला न्यायाधीश मेरी के हॉल्थुज या देओराब रेडर्स या व्यक्तीविरोधात बॅटरी गैरव्यवहाराच्या आरोपांवर सुनावणी करत होत्या.
त्यावेळी देओब्रा रेडर्स याने न्यायाधींशांसमोरील टेबलावरून उडी मारुन न्यायाधीशांवर झडपच घातली. यामुळे न्यायाधीश महिला मागे पडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालयातील सर्वच उपस्थित काही क्षण भांबावून गेले होते. मात्र प्रसंहावघान राखून न्यायाधीशांचा सहायक आणि काही वकिलांनी हल्लेखोराला जेरबंद केले.
मागील भिंतीवर त्या धडकल्यामुळे न्यायाधीश महिलेला थोडी दुखापत झाली. मात्र त्यांना रुग्णालयात न्यावे लागले नाही. मात्र त्यांच्या सहायकाला आणि कोर्ट मार्शलला थोडी दुखापत झाली. हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने कोठडीमध्ये नेले आणि त्याच्यावर न्यायाधीशांवर हल्ला, कामकाजामध्ये अडथळा, घातक कृत्य आणि दहशत निर्माण करण्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.