पुणे- दीड वर्षापासून वॉंण्टेड असलेल्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाण आणी धमकावण्याचा गुन्हा दाखल होता.
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय पोलीस अंमलदार ज्ञाना बडे , भोकरे, शीतकाळ , शिंदे, दळवी गस्त घालत होते.
यावेळी पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना एक खबर मिळाली होती. त्यानूसार दीड वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी अम्मार मुक्तार शेख (28 रा. सय्यदनगर वानवडी) हा गणिबाबा दर्गा गुलतटेकडी या ठिकाणी येणार होता. त्यानुसार त्यास ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक जायभाय करत आहेत