शेअर निर्देशांकांना लसीचा बूस्टर

मुंबई – बऱ्याच औषधी कंपन्यांच्या करोना लसीच्या चाचण्या यशस्वी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 194 अंकांनी म्हणजे 0.44 टक्‍क्‍यांनी वाढवून 44,077 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंकांनी वाढून 12,926 अंकावर बंद झाला.

निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असूनही लस उपलब्ध होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचे दिसून आले. रिलायन्स आणि फ्युचर रिटेलदरम्यानच्या व्यवहाराला स्पर्धा योगाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे रिलायन्स कंपनीचा शेअर वधारला.

त्याचबरोबर सोमवारी इन्फोसिस, टीसीएस, ओएनजीसी, इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस या कंपन्यांचे शेअर वधारले. आर्थिक अडचणीत असलेल्या लक्ष्मीविलास बॅंकेचा शेअर आज 10 टक्‍क्‍यांनी कोसळला. गेल्या पाच दिवसांपासून या बॅंकेचा शेअर तब्बल 48 टक्‍क्‍यांनी घसरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.