मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहणार आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार अन् संजय राठोड यांना खाती गमावली.
अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिउत्तर दिल आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांसाठी अंतिम असतो. मी नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती केली होती की मला खातं बदलून द्या. माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आहे.’ असं म्हणत त्यांनीच विनंती केली असल्याचे ते म्हणाले आहे.
दरम्यान,शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोन मंत्र्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. त्यांच्याकडील अनुक्रमे कृषी आणि अन्न व औषध प्रशासन ही खाती काढून घेऊन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली असून, शिंदे गटाला हा सूचक इशारा मानला जातो.
शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोन मंत्र्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. कृषी खात्यातील गैरप्रकार, सत्तार यांच्या खासगी सचिवांकडून करण्यात आलेली छापेमारी, कृषी प्रदर्शनासाठी निधीचा जमवाजमव यावरून सत्तार वादग्रस्त ठरले होते. शिंदे यांच्याकडून सत्तार यांच्या मनमानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आक्षेप होता.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात औषध विक्रेत्यांच्या संघटनेने तक्रार केली होती. राठोड यांच्यावर पैसे घेत असल्याचा आरोपही झाला होता. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असता तक्रारी असलेल्या काही मंत्र्यांना वगळा, अशी सूचना भाजपच्या श्रेष्ठींनी केली होती. सत्तार यांच्याकडील कृषी हे महत्त्वाचे खाते काढून पणन आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ तर, संजय राठोड यांच्याडे मृद व जलसंधारण ही खाती सोपविण्यात आली आहेत.