* पुणे सातारा महामार्गावर जीवघेणा थरार
* अखेर नसरापूर ग्रामस्थांनी ट्रक अडवून लटकलेल्या कर्मचाऱ्यांची केली सुटका
पुणे : खेडशिवापुर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला एका ट्रक चालकाने तब्बल बारा किलोमीटर पर्यंत फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे सातारा या महामार्गावर ही थरारक घटना घडली आहे.
ट्रक भरधाव वेगाने जात होता त्यावेळी ट्रक ओव्हरलोड आहे का अशी विचारणा करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला नशेत असलेल्या ट्रक चालकाने पुढे जवळपास बारा किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. दरम्यान, पुढे नसरापूर येथील गावकऱ्यांनी ट्रक अडवून लटकलेल्या सौरभ कोंडे या कर्मचारी ची सुटका करून जीव वाचवण्यात आला हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
TN48 BC6280 नंबर असलेल्या ट्रकच्या समोरील बाजूस तरुण लटकलेला दिसून येत आहे आणि हा सगळं थरार पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापुर टोल ते नसरापूर गावा पर्यंत चालू होता. अखेर ट्रक आणि चालक यांना किकवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.