वॉशिंग्टन : चित्रपट पाहणे हा अनेकांच्या मनोरंजनाचा प्रमुख हेतू असतो. नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहायचा आहे. असे त्यांनी मनोमन ठरवून टाकलेले असते आता अशाच प्रकारचा छंदाचे रूपांतर एका विक्रमात झाले आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने एका वर्षभराच्या कालावधीमध्ये तब्बल 777 चित्रपट पाहिले असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली आहे.
झॅक सोप असे या इसमाचे नाव असून त्याने 22 जुलै 2022 ते 21 जुलै 2023 या वर्षभराच्या कालावधीमध्ये 777 चित्रपट पाहिले आणि त्याने यापूर्वीचा फ्रान्समधील एका व्यक्तीने केलेला वर्षभरात ७१५ चित्रपट पाण्याचा विक्रम मोडीत काढला. गिनीज बुकने या विक्रमाची नोंद केली आहे. एक सोपने दिलेल्या माहितीप्रमाणे त्याला चित्रपट पाहणे खूप आवडते आणि सर्वसाधारणपणे तो वर्षभरात शंभर ते दीडशे चित्रपट पहात असतो.
गेल्या वर्षी केवळ विक्रम करण्याच्या हेतूने त्याने तब्बल 777 वेळा चित्रपट गृहाला भेट देऊन चित्रपटाचा आनंद घेतला. या विक्रमाला सुरुवात केली तेव्हा पाहिलेला पहिला चित्रपट होता. मिनियनस राईज ऑफ ग्रु आणि विक्रम संपताना शेवटचा चित्रपट पाहिला तो होता.
इंडियाना जोन्स , गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्याने त्याच्या या विक्रमावर लक्ष ठेवले होते कारण अशा प्रकारचा चित्र अशा प्रकारचा विक्रम करताना चित्रपट संपूर्ण पाहणे बंधनकारक असते. तसेच चित्रपट पाहताना कोणताही ब्रेक घेता येत नाही. रिगल नावाच्या एकाच चित्रपटगृहात बहुतेक सर्व चित्रपट त्याने पाहिले. त्यामुळे या चित्रपटाच्या कर्मचाऱ्यांनी या विक्रमावर लक्ष ठेवले होते. चित्रपट पाहत असताना त्याने कोठेही खाण्याचा किंवा पिण्याचा ब्रेक घेतला नव्हता.