मुंबई – अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये देखील कमाल कामगिरी केली आहे. सध्या तिचे ‘कावाला’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला अनेकांची मोठी पसंती मिळत आहे. नुकतेच तमन्नाने ‘जीक्यू’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. यात तिने सुंदर लुक केला होता. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तमन्ना भाटिया बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत अवॉर्ड शोमध्ये पोहचली होती. यावेळी तिने यावेळी तमन्नाने जांभळ्या रंगाचा बॅकलेस शिमरी गाऊन घातला होता. या गाऊनवर तमन्नाने वेगवेगळे नेकलेस आणि जांभळ्या रंगाच्या हील्स घातल्या होत्या. या ने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तिच्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या हटके लुकचे काही फोटो तिने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्डला सान्या मल्होत्रा, श्रिया सरन, मंदिरा बेदी, आयुष्मान खुराना या सारखे अनेक कलाकर उपस्थित होते. सध्या या कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तमन्ना भाटियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘बाहुबली’ चित्रपटामुळे अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तमन्ना हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे.