मुंबई – प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेते आमिर खान यांची मुलगी इरा खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ‘माझे लैंगिक शोषण झाले होते’, असा गौप्यस्फोट केला होता.
View this post on Instagram
इरा खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. यावेळी तीने नेमके कारण सांगितले नव्हते.
View this post on Instagram
यातच तिने इंस्टाग्रामवर शेअर पुन्हा एक व्हिडीओ करत ती म्हणते की,’नैराश्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा सल्ला दुसऱ्या व्यक्तीला पटेल असे नाही. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने पाहा, वर्कआऊट करा. काही लोकं तुम्हाला स्वत:ला कामात व्यग्र ठेवा असे सांगितल तर काही लोकं कामापासून लांब रहा असे म्हणतील. पण तीन चार डॉक्टरांना भेटल्यानंतर मला कळाले की व्यग्र राहणे हा योग्य उपाय नाही.’
दरम्यान, तिने इन्स्टाग्रामवर यापूर्वीही व्हिडीओ शेअर करत लैंगिक शोषण झाले असल्याचा गौप्यस्फोट केला होता