मुंबई – बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच टीव्हीवरील एका शोमध्ये हजेरी लावणार आहे. मिस्टर-परफेक्शनिस्ट टीव्हीवरील ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’च्या ग्रँड फिनालेमध्ये पाहूना म्हणून येणार आहे. शोशी संबंधित अनेक प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आले आहेत. यामध्ये आमिर खानच्या आगमनाबाबत टीव्ही स्टार्स खूपच उत्सुक दिसत आहेत. तसेच आमिरचे फॅन्सही त्याला टीव्हीवर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
आमिर त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने टीव्ही स्टार्ससोबत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. यात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर देखील आहे. चित्रपटाचे अनेक लूक्स रिलीज करण्यात आले आहेत. यामध्ये आमिर सरदाराच्या भूमिकेत आहे. आमिरच्या या चित्रपटात गेल्या 5 दशकातील भारत दाखवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.
मात्र, मोठ्या पडद्याआधी आमिर छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कलर्सवर ‘डान्स दिवाने ज्युनियर’ या शोद्वारे अभिनेता छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीवर झळकणार आहे. तो शोच्या ग्रँड फिनालेला हजेरी लावणार आहे. या शोचे अनेक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. डान्स दिवाने ज्युनियर शोचा फिनाले 16 आणि 17 जुलै रोजी प्रसारित होईल.
View this post on Instagram
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. खिलाडी कुमारच्या रक्षाबंधनचा ट्रेलरही समोर आला आहे. डान्स दिवाने ज्युनियरमध्ये रणबीर कपूरही त्याच्या ‘शमशेरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. आगामी काळात अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.