मुंबई – व्हीआयपी व्यक्तींना आपल्या सुरक्षिततेवर नेहमीच खर्च करावा लागतो. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांवर अवलंबून न राहता स्वतःची सुरक्षा घेऊन सोबत फिरावे लागते. ज्यात अनेक बॉलिवूड स्टार्सचा समावेश आहे. जे इतरांच्या सिक्युरिटीवर अवलंबून न राहता स्वतःची सेक्युरिटी घेऊन फिरतात. यासाठी ते वर्षाला करोडो रुपये खर्च देखील करतात.
आलिया भट्टचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे त्यामुळे ती जिथे जाईल तिथे गर्दी होते. सुनील तेलकर आलियाला लहान असल्यापासून संरक्षण देत आहे आणि आजपर्यंत ती आलियाची बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या बॉडीगार्डला वर्षभरासाठी 50 लाख रुपये देते.
अमिताभ बच्चन हे आजही सुपर स्टार आहेत. यंग जनरेशन पासून ते ओल्ड जनरेशनपर्यंत सर्वच अमिताभचे फॅन्स आहेत. अमिताभ बच्चन आपल्या सुरक्षेसाठी तब्बल २ कोटींचा खर्च करतात. जितेंद्र शिंदे हा अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड असून तो अनेक वर्षांपासून त्यांच्या सोबत आहे.
आमिर खान विना सुरक्षा प्रवास करण कधीच पसंद करत नाही. युवराज घोरपडे हे आमिरच्या बॉडीगार्डचे नाव आहे. आमिर आपल्या बॉडीगार्डला महिन्याला १५ लाख रुपये देत असल्याचे समोर आले आहे.
सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेराला कोण ओळखत नाही. बॉडीगार्ड म्हंटल की शेअर सर्वच्या नजेरेसमोर येतो. शेरा १९९८ पासून सलमानसोबत आहे. सलमान खान शेराला वर्षभरासाठी तब्बल २ कोटी रुपये मानधन देतो. यासोबतच शेरा आपली स्वतःची सेक्युरिटी एजन्सी देखील चालवतो.
बॉलिवूड स्टार्स पैकी आपल्या सुरक्षेसाठी सर्वात जास्त खर्च करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान आहे. शाहरुखचे फॅन फॉलोविंग वर्ल्डवाईड आहे. त्यामुळे एसआरके जिथे जाईल तिथे गर्दी तर होतेच म्हणूनच त्याला सुरक्षेसाठी सर्वाधिक खर्च करावा लागतो. तो आपल्या सुरक्षेसाठी वर्षभरासाठी तब्बल अडीच कोटींचा खर्च करतो.