मुंबई – आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बऱ्याच कालावधीनंतर तो या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला त्याच्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांबाबत त्यांनी अनेकवेळा आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
नुकतंच आमिरने त्याच्या साऊथच्या सुपरस्टार मित्रांसाठी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. स्क्रिनींगनंतर मित्रांनी आमिरच कौतुक केलं त्यावेळी आमिरला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. साऊथ स्टार चिरंजीवीने याबाबत एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये आमिर खान भावूक होताना दिसत आहे. स्पेशल स्क्रिनिंगवेळी साऊथ सुपरस्टार चिरंजीवी, नागार्जुन, एसएस राजामौली, सुकुमार आणि नागा चैतन्य यांसारखे मोठे स्टार्स उपस्थित होते.
चिरंजीवीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने या स्पेशल स्क्रिनिंगच्या खास क्षणांसोबतच चित्रपटाविषयी आपले मत मांडले आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले- ‘काही वर्षांपूर्वी मी माझा खास मित्र आमिर खानला जपानमधील क्योटो विमानतळावर भेटलो. त्यादरम्यान, एक छोटासा संभाषण करून, मी लाल सिंह चड्ढा यांच्या ड्रीम प्रोजेक्टचा एक भाग झालो. माझ्या घरी खास प्रिव्ह्यू दिल्याबद्दल मी आमिर खानचे आभार मानतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यांनी एक अप्रतिम चित्रपट बनवला असल्याचे चिरंजीवीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
व्हिडिओमध्ये आमिर खान RRR दिग्दर्शक एसएस राजामौली, सुकुमार, अभिनेते नागार्जुन, नागा चैतन्य आणि चिरंजीवी यांच्याशी बोलताना दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर, जेव्हा प्रत्येकजण त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि चित्रपटाबद्दल बोलतो तेव्हा आमिरला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आमिरच्या डोळ्यातील अश्रू पाहून चिरंजीवी त्याला प्रेमाने मिठी मारतो.
Fascinating how a chance meeting & a little chat with my dear friend #AamirKhan @Kyoto airport – Japan, few years ago led to me becoming a part of his dream project #LaalSinghChaddha
Thank You #AamirKhan for the exclusive preview at my home.Heartened by your warm warm gesture! pic.twitter.com/hQYVZ1UQ5m
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) July 16, 2022
आता हा चित्रपट एसएस राजामौली आणि चिरंजीवी यांच्यासारख्या दिग्गजांना आवडला तर हा चित्रपट सुपरहिट होईल, असा विश्वास ट्विटरवरील फॅन्स कमेंटद्वारे मांडत आहे.