मुंबई – शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. पठाणच्या यशावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आनंद व्यक्त करत आहेत.अभिनेता आणि स्वतःला बोलीवूड क्रिटिक जमजणाऱ्या कमाल आर खानने पठाणवरून थेट आमिर खानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पठाण’ सुपरहिट झाल्याने आमिर खान खूप दु:खी असल्याचे त्याने म्हटले आहे.
नेहमी बॉलीवूड कलाकारांवर टीका करणारा कमल आर. खान अर्थात केआरके पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. बॉलीवूड चित्रपटांबाबत तो खुलेपणाने आपले मत व्यक्त करतो. सध्या त्याने पठाणबाबत एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “आमिर खानची वेळ खूप खराब सुरु आहे. पाहिलं दुःख हे की त्याचा चित्रपट लाल सिंह चड्डा चालला नाही,आणि दुसरं दुःख हे की शाहरुखचा चित्रपट सुपरहिट झाला” अशा आशयाचे ट्विटी केआरकेने केले आहे.
Aamir Khan ka Waqt Bahut kharab Chal Raha Hai. Pahla Dukh Ye, Ki Bechare Ki film #LSC Disaster Ho Gayee. Doosra Usse Bhi Bada Dukh Ye, Ki SRK ki film super hit Ho Gayee.🤪
— KRK (@kamaalrkhan) January 27, 2023
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
पठाण सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.बॉयकॉटला फाट्यावर मारत पठाणने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवल्याने सर्वांकडून पठाणचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे.