– रामचंद्र सोनवणे (प्रतिनिधी)
राजगुरूनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत अपशब्द वापरणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उघडे करून मारणारास एक लाखाचे बक्षीस खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येईल अशी घोषणा तालुका राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर यांनी निषेध सभेत केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत अपशब्द वापरल्याबद्दल खेड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.२१) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला चपला मारून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर यांनी केले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा संध्या जाधव, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, राजगुरुनगर शहर अध्यक्ष सागर सातकर, आशा तांबे, पप्पू टोपे, विलास कातोरे, राजाराम लोखंडे,अशोक राक्षे,रणजित गाडे, गणेश बोत्रे, राम गोरे, मनीषा टाकळकर,
वैभव घुमटकर, पप्पू बनसोडे ,वैभव नाईकरे, संतोष भांगे, नितीन गुरव, महेश होले,अमोल पिंगळे, विशाल दौडकर ,किरण पवार, लक्ष्मण शिंदे, युवराज बंदावणे,रामेश्वर पाटील, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, बबनराव शिवले, काळूराम भोसकर, बाळासाहेब अरगडे,अशोक पाचारणे यांच्यासह राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस कैलास सांडभोर म्हणाले, अजित पवार हे राज्याच्या विकासात प्रभावी नेतृत्व आहेत. मात्र त्यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून खालच्या पातळीवर टीका केली जाते. ते वारंवार टीका टिपणी करत आहेत. भाजपने पडळकर सारखी माणसे राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करण्यासाठी पोसली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे तो कधीही पूर्ण होणार नाही. पडळकर यांचा इतिहास सर्वाना माहिती आहे. पवार परिवाराबाबत नेहमीच अपशब्द वापरून शरद पवार, अजित पवारांवर खालच्या शब्दात टीका करतो. भाजपने अशा व्यक्तीला समज देत त्याची भाजप पक्षाने हलकंपट्टी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून.
पडळकर यांना उघडे करून मारणारास तालुका काँग्रेसकडून एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा तालुका अध्यक्ष सांडभोर यांनी यावेळी केली. आंदोलनादरम्यान आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.