पाटणा : चीनमधून परतलेल्या एका युवतीला बिहारमध्ये कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत. तिच्यात कोरोना बाधितांची लक्षणे आढळत आहेत, असे सरकारी सुत्रांनी सांगितले.
या युवतीला तातडीने पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला या विषाणूंची बाधा झाली आहे का? याची तपसाणी करत आहेत. दरम्यान, चीनमधून परतलेला आणखी एका विद्यार्थ्यावर कोरोना विषाणूने प्रभावित असल्याची लक्षणे आढळत आहे. या दोन्ही रुग्णांच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
एनआयव्हीकडून मंगळवारी सकाळपर्यंत त्याचा अहवाल येईल. तो पर्यंत ते कोरोना बाधीत आहे असे गृहीत धरून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील आणि तशी काळजी घेण्यात येईल, असे वैद्याकीय सुत्रांनी सांगितले.