#AusOpen : ‘रोहन-नादिया’ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

मेलबर्न : आॅस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णानं आपली साथीदार युक्रेनची नादिया किचेनोक सह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

मिश्र दुहेरीत रोहनने नादिया सह दुस-या फेरीत ब्राझीलचा ब्रूनो सोअर्स आणि अमेरिकेची निकोल मेलीचर या जोडीचा ६-४, ७-६ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही लढत १ तास १० मिनिटे चालली.

दरम्यान, याआधी रोहन बोपण्णाने नादिया किचेनोकच्या साथीत विजयी सलामी दिली होती. रोहन-नादिया यांनी आॅस्टिन के.-लियूडमायला किचेनोक यांच्यावर ७-५,४-६, १०-६  अशी मात केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.