वाघोली – पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोली गावच्या विकास कामांच्या बाबतीत माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्याशी संवाद साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी विकास कामांचा आढावा घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या पूर्वीच्या 11 आणि नंतरच्या 23 गावांचा विकास व्हावा यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून वारंवार बैठका आयोजित करण्यात येत असून त्याद्वारे विकास कामांना गती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाघोली मधील विविध विकास कामांच्या बाबतीत आढावा घेत वाघोलीतील समस्या सोडवण्याचे आश्वासन माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांना दिले आहे.
याबाबतीत जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की रस्ते, वीज, पिण्याचे पाणी तसेच सांडपाण्याच्या बाबतीत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा याबाबतची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली असून त्यांनी पुणे मनपा प्रशासनाकडून याबाबतीत लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.