मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा पहिला बाधित सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तेथील एका ५६ वर्षीय गृहस्थावर शिव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या बाधितांच्या कुटुंबीयांपैकी आठ ते दहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हि व्यक्ती रहात असलेली इमारत प्रशासनाने सील केली आहे. तेथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यात येत आहे. त्यांना इमारतीतून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
६१३ हेक्टर मध्ये पसरलेल्या या भागात १५ लाखापेक्षा अधिक लोक राहतात. त्या भागात हि साथ पसरू नये, यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. महाराष्ट्रात ३२० कोरोनाबाधित असून त्यातील निम्मे मुंबईत आढळले आहेत.. वरळी कोळीवावा आणि गोरेगाव उपनगर हे दोन भाग प्रशासनाने होंटस्पॉट मफहणून जाहीर केले आहेत.