भाजपची ‘रम्याचे डोस’च्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका
मुंबई : अवघ्या काही दिवसांत राज्यात मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारात भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली आहे. दरम्यान रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून भाजपने विरोधकांवर टीका करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. सध्या राज्यात गाजत असलेला शरद पवार यांच्या ईडी चौकशीचा विषयावरुन भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यानंतर राज्यात कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शवला जात आहे.
तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्यांना रम्या म्हणतो “बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है…!”#रम्याचेडोस#BaramatiKaramati
@NCPspeaks pic.twitter.com/lWKH266qq6— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 26, 2019
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मी काही बरं-वाईट केलं म्हणून तुरुंगात गेलो नाही असं विधान करत अमित शहांना टोला लगावला होता. यानंतर आता भाजपने आपल्या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून शरद पवारांना टोला लगावला आहे. भाजपाने बरी-वाईट कामं आणि मुन्नाभाईचं तत्त्वज्ञान असे एक मीम शेअर केले आहे. यामध्ये रम्याचे डोस या माध्यमातून त्यांनी निशाणा साधला आहे. रम्याला त्याचा मित्र म्हणतो रम्या… साहेब म्हणतायत… मी अनेक वर्षे बरी-वाईट कामं केली पण कधी तुरुंगात गेलो नाही. यावर रम्या उत्तर देतो. “बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है…! अशा शब्दांमध्ये भाजपकडून पवारांवर टीकास्त्र साधण्यात आले आहे.