नेवासा, (प्रतिनिधी) – चिलेखनवाडी (ता.नेवासा) येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातील ४६,५६० रुपये किंमतीचे १६ सीलबंद बॉक्स व ५ हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर, असा एकूण ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.
ही घटना नेवासा – शेवगाव राज्यमार्गावरील चिलेखनवाडी शिवारात घडली. याबाबत अजित अशोक मंडलिक यांनी फिर्याद दिली. कुकाणा गावातील मारुती मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील मुद्देमाल लंपास करण्यात आला. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
देशी दारू दुकान मॅनेजर सोमनाथ मंडलिक हे सकाळी ९ वाजता चालू करून रात्री ९ वाजता बंद करत असतात. मंडलिक हे बंद केलेले देशी दारुचे दुकान उघडण्यासाठी बुधवारी (दि.१४) आले असता दुकान अर्धवट अवस्थेत उघडलेले दिसले. त्याची समक्ष पाहणी केली असता दुकानातील १६ देशी दारुचे बॉक्स व सीसीटीव्हीचा डिव्हीआर, असा एकूण ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन पोबारा केला. त्यानंतर कुकाणा गावातील मारुती मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात असलेली दानपेटी फोडली.