मुंबई – अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या या गाण्याला अनेकांची मोठी पसंती मिळत आहे. तमन्नाचे देशभरात अनेक चाहते आहे. मात्र तिच्या एका अतिउत्साही चाहत्याने तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्याजवळ उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तमन्नाचा व्हायरल व्हिडिओ केरळच्या एका कार्यक्रमामधील आहे. यावेळी तिने हिरवी साडी आणि गुलाबी ब्लाउज परिधान केला आहे. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. मात्र कार्यक्रमानंतर ती बाहेर पडल्यावर चाहत्यांनी तिच्याभोवती मोठी गर्दी केली होती. मात्र त्याचवेळी एक चाहता बॅरिकेडवरून उडी मारत तिच्याकडे येतो. फॅन तमन्नाला हात मिळविण्यासाठी धडपडत असतो. तेव्हा सुरक्षारक्षक फॅनला मागे खेचतो. चाहत्याने केलेल्या या कृत्याने तमन्ना देखील अचंबित झाली होती.
मात्र यावेळी तमन्ना देखील सुरक्षारक्षकाला त्या चाहत्याला भेटू देण्यास सांगते. इतकेच काय तर त्याच्यासोबत हात मिळवते आणि सेल्फीसाठी पोझही देते. तिच्या या कृतीचे अनेकजण कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहून ‘तमन्ना खुप नम्र आहे,’ असे काहींनी म्हंटले आहे. तर काही जणांनी चाहत्याच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, 6 जुलै रोजी तमन्ना भाटिया आणि रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तमन्नाची स्टाईल लोकांची मने जिंकत आहे.