मुंबई – अभिनेता शाहरुख खानच्या डॉन २ नंतर आम्ही तिसर्या भागाची आतुरतेने वाट पाहत होतो. फरहर अख्तर जेव्हा जेव्हा घोषणा करायचा तेव्हा लोकांना वाटायचे की तो डॉन 3 चीच घोषणा करणार आहे. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
फरहानने आता डॉन 3 ची घोषणा केली आहे. डॉन 3 सोबत एक नवे युग घेऊन येत असल्याचे फरहानने म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानऐवजी रणवीर सिंग डॉन ३ मध्ये दिसणार आहे. यानंतर चाहते संतापले. फरहान अख्तरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने डॉन 3 बद्दल सांगितले आहे. फरहानने स्टारकास्टबद्दल काहीही सांगितले नसले तरी रणवीर सिंगने शाहरुख खानची जागा घेतली आहे. मात्र आता चाहते रणवीरच्या कास्टिंग चर्चांवर फरहानवर टीका करत आहे. तर काही चाहते संभ्रमात आहे. चाहते शाहरुख कि रणवीर असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहे.
रणवीर सिंगच्या डॉन 3 मधील मुख्य अभिनेत्याची घोषणा लवकरच होणार आहे. निर्माते गदर 2 आणि OMG 2 च्या रिलीजसह टीझर रिलीज करण्याचा विचार करत आहेत. जो या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळीच्या बैजू बावरा या चित्रपटाचे शूटिंग संपवून रणवीर सिंग डॉन 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. डॉन 3 मधून फरहान दिग्दर्शनाकडे परत येत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.