नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीची लोकसभेतील ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
खासदार फैजल यांच्यावर हत्येचा आरोप होता यामध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर खासदार फैजल यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ११ जानेवारीपासून फैजल यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे.
मोह्हम्मद फैजल हे लक्षद्वीपचे नेतृत्व करतात. लक्षद्वीप न्यायालयाने फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाने खासदार फैजल यांचे सदस्यत्व रद्द केल्याची अधिसूचना जारी केली आहे. तसेच हा निर्णय राज्यघटनेच्या कलम १०२ (१)(ई),लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ८ मधील तरतुदीनुसार घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
Mohammad Faizal, NCP MP who represented Lakshadweep in the Lok Sabha has been disqualified from the Lower House of Parliament
Yesterday, a court in Lakshadweep sentenced Faizal to 10 years imprisonment in a 2009 attempt to murder case pic.twitter.com/HcLZPcanu9
— Poulomi Saha (@PoulomiMSaha) January 14, 2023
खासदार फैजल यांच्यावर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. सलिया यांच्यावर जमावाने हल्ला केला होता यात ते गंभीर जखमी झाले होते. परंतु फैजल यांनीच जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप करत ऐकून ३२ जणांवर खटला दाखल करण्यात आला होता. त्यातील ४ जणांना शिक्षा ठोकावण्यात आली आहे.