मुंबई – मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीने महिलेचा चेहरा, डोके, प्रायव्हेट पार्ट व इतर अवयांवर अमानुष मारहाण केली असून, यामुळे ही महिला बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या महिलेची रुग्णालयात जावून भेट घेत या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ( Mumbai Crime )
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक याने पीडित महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केला. आरोपीने महिलेला तिच्या घरी न सोडता स्वतःच्या घरी नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर पहाटे ५ च्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून देवून तेथून पळ काढला. ( Chitra Wagh )
मंगळवारी पहाटे पीडित महिला रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्थानिक महिलेला दिसली. तिने त्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द इथे घडलीय.
घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या… pic.twitter.com/ZR8tdvvfkZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 20, 2023
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रुग्णालयात जावून पीडित महिलेची भेट घेतली. राज्य सरकार या प्रकरणी जलद कारवाई करून आरोपीला शासन करेल, असे त्या म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी या प्रकरणी आपल्या भावना एका ट्विटद्वारे व्यक्त केल्या.