IPL 2024 Squads After Auction : मंगळवारी दुबईतील कोका-कोला एरिना येथे आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव करण्यात आला. सर्व संघानी त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडूंवर बोली लावली. अनेकार्थांनी विक्रमी व ऐतिहासिक ठरलेल्या या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावात 24.75 कोटींना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक भाव खाऊन गेला ज्यामुळे आता तो आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.
अलीकडेच, आयपीएल संघांनी त्यांच्या संबंधित राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली होती. त्याचवेळी, आता आयपीएल लिलावानंतर सर्व संघ आगामी हंगामासाठी सज्ज झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससह सर्व संघांचे संघ पूर्ण झाले आहेत.
आयपीएलच्या मिनी ऑक्शन लिलावात 332 खेळाडूंवर बोली लावली जाणार होती, परंतु सर्व 10 संघांना फक्त 77 जागा रिक्त होत्या. अशा स्थितीत केवळ 72 खेळाडू विकले गेले होते, त्यापैकी 30 विदेशी खेळाडू होते. या लिलावात आयपीएल संघानी 230 कोटी रूपये खर्चुन 72 खेळाडूंची खरेदी केली. त्यामध्ये चेन्नईच्या ताफ्यात 6, दिल्लीत 9, गुजरातने 8, कोलकाता 10, लखनऊने 6, मुंबईने 8, पंजाबने 8, राजस्थानने 5, बंगळुरूने 6 आणि हैदराबादने 6 खेळाडूंची खरेदी केली.
लिलावानंतर मुंबई, चेन्नई, आरसीबीसह दहा संघ कसे असतील, कोण भारी आणि कोणाची ताकद वाढली याची चर्चा सुरु झाली आहे. तर चला एक नजर टाकूया….. आयपीएल 2024 हंगामापूर्वी आयपीएल 2024 मध्ये दहा संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहेत…
1. चेन्नई सुपर किंग्ज –
रिटेन खेळाडू : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकिपर), ,ऋतुराज गायकवाड, अजिक्य रहाणे, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकिपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे,राजवर्धन हुंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी आणि महेश तिक्ष्णा.
ऑक्शनमधील खेळाडू : रचिन रवींद्र (1.80 कोटी), शार्दुल ठाकूर (4 कोटी), डॅरिल मिशेल (14 कोटी), समीर रिझवी (8.4 कोटी), मुस्तफिजुर रहमान (2 कोटी) आणि अवनीश राव अरवेली (20 लाख)
2. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-
रिटेन खेळाडू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल,रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), विशाक कुमार विजा. , आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार आणि कॅमेरून ग्रीन (व्यापार).
ऑक्शनमधील खेळाडू : अल्झारी जोसेफ (11.50 कोटी), यश दयाल (5 कोटी), टॉम कुरन (1.5 कोटी), लॉकी फर्ग्युसन (2 कोटी), स्वप्नील सिंग (20 लाख) आणि सौरव चौहान (20 लाख).
3. कोलकाता नाइट राइडर्स
रिटेन खेळाडू : श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
ऑक्शनमधील खेळाडू : मिचेल स्टार्क (24.75 कोटी), केएस भरत (50 लाख), चेतन साकारिया (50 लाख), आंग्रिश रघुवंशी (20 लाख), श्रीकर भारत (50 लाख), रमणदीप सिंग (20 लाख), शेरफेन रदरफोर्ड (1.5 कोटी), मनीष पांडे ( 50 लाख), मुजीब उर रहमान ( 2 कोटी), गस ऍटकिन्सन ( 1 कोटी) आणि साकिब हुसेन ( 20 लाख).
4. गुजरात टायटन्स :
रिटेन खेळाडू : शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.
ऑक्शनमधील खेळाडू : शाहरुख खान (7.4 कोटी), अजमतुल्ला उमरझाई (50 लाख), उमेश यादव (5.80 कोटी), सुशांत मिश्रा (2.2 कोटी), कार्तिक त्यागी (60 लाख), मानव सुथार (20 लाख), स्पेन्सर जॉन्सन ( 10 कोटी) आणि रॉबिन मिन्झ (3.6 कोटी).
5. मुंबई इंडियन्स –
रिटेन खेळाडू : हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ आणि रोमॅरियो शेफर्ड.
ऑक्शनमधील खेळाडू : जेराल्ड कोएत्झी (5 कोटी), दिलशान मदुशंका (4.6 कोटी), नुवान तुषारा (4.8 कोटी), मोहम्मद नबी (1.5 कोटी),श्रेयस गोपाल (20 लाख), नमन धीर (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख), शिवालिक शर्मा (20 लाख)
6. सनरायझर्स हैदराबाद –
रिटेन खेळाडू : एडन मार्कराम (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग. यादव, उमरान मलिक, नितीशकुमार रेड्डी, फजलहक फारुकी आणि शाहबाज अहमद.
ऑक्शनमधील खेळाडू : पॅट कमिन्स (20.5 कोटी), ट्रॅव्हिस हेड (6.8 कोटी), वानिंदू हसरंगा (1.5 कोटी), जयदेव उनाडकट (50 लाख), आकाश महाराज सिंग (20 लाख) आणि जे सुब्रमण्यम (20 लाख)
7. लखनऊ सुपर जायंट्स –
रिटेन खेळाडू : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, काइल मेयर्स, दीपक हुडा, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान आणि देवदत्त पडिक्कल (ट्रेडेड).
ऑक्शनमधील खेळाडू : शिवम मावी ( 6.40 कोटी), मणिमारन सिद्धार्थ (2.4 कोटी), अर्शिन कुलकर्णी (20 लाख), ऍश्टन टर्नर (1 कोटी), डेव्हिड विली (2 कोटी) आणि मोहम्मद अर्शद खान ( 20 लाख).
8. राजस्थान रॉयल्स –
रिटेन खेळाडू: संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकिपर), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनोवन फरेरा, रविचंद्रन अश्विन, टी. युझवेंद्र चहल, क्रुणाल राठौर, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, संदीप शर्मा, अॅडम झम्पा आणि आवेश खान (ट्रेडेड).
ऑक्शनमधील खेळाडू : रोवमन पॉवेल (7.4 कोटी), शुभम दुबे (5.8 कोटी), टॉम कोहलर कॅडमोर (40 लाख), आबिद मुश्ताक (20 लाख) आणि नांद्रे बर्जर (50 लाख).
9. पंजाब किंग्ज –
रिटेन खेळाडू: शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (विकेटकिपर), प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), सिकंदर रझा, ऋषी धवन, राहुल चहर, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरन, कागिसो रबाडा, हरप्रीत , हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा आणि शिवम सिंग.
ऑक्शनमधील खेळाडू : हर्षल पटेल (11.75 कोटी), ख्रिस वोक्स (4.20 कोटी), आशुतोष शर्मा (20 लाख), विश्वनाथ प्रताप सिंग (20 लाख), शशांक सिंग (20 लाख), तनय त्यागराजन (रु. 20 लाख). 20 लाख) रु.), प्रिन्स चौधरी (रु. 20 लाख) आणि रिले रुसो (8 कोटी).
10. दिल्ली कॅपिटल्स –
रिटेन खेळाडू : ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, यश धुल आणि मुकेश कुमार
ऑक्शनमधील खेळाडू : कुमार कुशाग्रा (7.2 कोटी), हॅरी ब्रूक (4 कोटी), झे रिचर्डसन (5 कोटी), ट्रिस्टन स्टब्स (50 लाख), रिकी भुई (20 लाख), रशीक दार सलाम (20 लाख), सुमित कुमार (1 कोटी), शाई होप (75 लाख) आणि स्वस्तिक चिकारा (20 लाख).