Ram Charan – अनेकदा साऊथ स्टार आपल्या अभिनयासोबत त्यांच्या दिलदार स्वभावासाठी देखील ओळखले जातात. अभिनेता रामचरण हे त्यातीलच एक नाव. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असूनही रामचरण नेहमी साधा आणि ग्राउंड टूअर्थ असल्याचे पाहायला मिळते.
रामचरण हा सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता असून, त्याचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या घरात आहे. रामचरण याचा ‘आर आर आर’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला. रामचरणने त्यात साकारलेली भूमिका देखील सर्वांना खूप आवडली आहे.
View this post on Instagram
साऊथ स्टार राम चरण सध्या मुंबईत आहेत. जो नुकताच पत्नी आणि मुलीसह मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात पोहोचला. याचा एक व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता उपासना आणि मुलगी कालिनसोबत मंदिरात आरती करताना दिसत होता.
याआधीही या जोडप्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये राम आणि उपासना मंदिराच्या पायऱ्या उतरताना दिसत होते. यावेळी उपासनाने कलिनला आपल्या मांडीत धरले होते. व्हिडिओमध्ये फ्लोरल सूट परिधान करून उपासना खूपच सुंदर दिसत आहे. राम चरणही पांढऱ्या शर्टमध्ये डॅशिंग दिसत आहे.