Rape Murder Case: केरळ न्यायालयाने लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत आज (दि. 14) पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अश्वक आलम असे फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. POCSO विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. सोमण यांनी ही शिक्षा सुनावली.
अश्वक आलम बिहारचा आहे. त्याने एर्नाकुलममध्ये 28 जुलै रोजी 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून कचऱ्यात फेकून दिला. न्यायालयाने अश्वकला घटनेच्या 100 व्या दिवशी 4 नोव्हेंबर रोजी दोषी ठरवले आणि आज त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
हे प्रकरण घृणास्पद आहे, त्यामुळे दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.
आरोपीने 28 जुलै रोजी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिचा गळा दाबून खून केला. नंतर मृतदेह अलुवा येथील परिसरात फेकून दिला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.