वाघोली(प्रतिनिधी): वाघोली येथील बाईफ रोडच्या संभाजीनगर परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदरची व्यक्ती पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक असून त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घराच्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून पोलीस व आरोग्य विभागाने भेटी दिल्या आहेत.
स्थानिक तरुणांच्या मदतीने परिसर सील करण्यात आला आहे. कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात येणार आहे. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे १२ रुग्ण सापडले असून यापैकी ७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ५ अॅकटीव रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.