“सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील “बम डिगी डिगी’ या गाण्यातील अभिनेत्री आणि मॉडल साक्षी मलिकने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सोशल मीडियावरही ती खूपच ऍक्टिव्ह असते. साक्षी सतत आपले फोटो चाहत्यांशी शेअर करत असतेच. साक्षी मलिकने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लुकने सोशल मीडियावर खळबळ उडविली आहे.
साक्षीने ट्रान्सपेरेंट मिनी ड्रेसमधील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. साक्षीचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला असंख्य चाहत्यांकडून लाइकस् आणि कमेंटस् करण्यात येत आहेत.
दरम्यान, साक्षी मलिक ही एक भारतीय मॉडल आहे. साक्षी ही तिच्या फिगरमुळे खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय साक्षीने अनेक ब्रॅण्डची ब्रॅण्ड अंबेसडर म्हणूनही काम केलेले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साक्षीने दिल्लीत इंजीनियरिंग पूर्ण केली. याच दरम्यान, साक्षी मॉडलिंगकडे वळली. मुंबईत पोहोचल्यानंतर साक्षीने पंजाबी अल्बमधून आपल्या करियरची सुरुवात केली.