बॉलीवूड अभिनेत्री आणि फिटनेस लव्हर दिशा पाटणीने बटलफ्लाय किकची एक्सरसाइज करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने अभिनेता टायगर श्रॉफ हा खूपच प्रभावित झाला आहे. दरम्यान, दिशा आणि टायगर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दिशाने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यात दिशा ही कोणत्या मदतीशिवाय आणि एकदम जबरदस्त बटरफ्लाय किक मारताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, बटरफ्लाय किक (फूलपाखरू आणि फुलाचे इमोजी). या पोस्टवर कमेंट करत टायगरने “क्लीन’ असे लिहित आग आणि टाळी वाजवितानाचा एक इमोजीही पोस्ट केला. तसेच टायगरची आई आयशा श्रॉफनेही “वाह दीशू’ अशी कमेंट केली आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दिशा ही सध्या आपल्या आगामी “राधे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तिच्यासोबत सुपरस्टार सलमान खान आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. याशिवाय “केटीना’ चित्रपटातही दिशा निणार्यक भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्माता एकता कपूर असून यात अक्षय ओबेरॉय आणि सनी सिंह काम करणार आहेत.