मुंबई – गोपीचंद पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहमदनगर करमाळा महामार्गावरील पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या पडळकर यांनी मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून एक व्हिडीओ बनवला आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या व्हिडिओला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगेलच उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1035327653597643
रोहित पवार म्हणाली कि, “माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय”. असं पवार म्हणाले.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर –
“पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीका कारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.