भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार एकत्रित मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि साउथचा सुपरस्टार प्रभास आणि महानायक अर्थात अमिताभ बच्चन लवकरच वैजयंती मूव्हीजच्या आगामी चित्रपटात सोबतच काम करणार आहेत. वैजयंती मूव्हीजने एक व्हिडिओ जारी करत याची अधिकृत घोषणा केली आहे.
रिलीज करण्यात आलेल्या या व्हिडिओत चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची झलक दाखविण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असा निश्चितपणे अंदाज येते की, हा चित्रपट खूपच भव्यदिव्य असा असणार आहे. या चित्रपटाची निर्माता अश्विनी दत्त असणार आहेत. अश्विनी दत्त म्हणाल्या, स्वर्गीय एनटीआर हे अमिताभ बच्चन यांचे प्रशंसक होते. त्यांनी त्यांच्या बॉलीवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे तेलुगु रिमेक केले आहेत.
एनटीआर आणि मी त्यांचा “शोले’ हा चित्रपट असंख्य वेळा पाहिलेला आहे. इतक्या वर्षांनंतर वैजयंती मूव्हिजच्या बॅनरखाली महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात काम करणार असल्याने आमच्यासाठी ही गर्व आणि सौभाग्याची गोष्ट आहे. दिग्दर्शक नाग अश्विन म्हणाले, मी स्वतःला भाग्यशाली मानतो की बच्चनसरांनी अनेक विकल्प असतानाही या चित्रपटाची निवड केली. या चित्रपटात त्यांची भूमिका फूल लेंथ असणार आहे आणि ही भूमिका त्यांना योग्य न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण हा चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.