कोल्हापूर : महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी येथे विद्यापीठ हायस्कूलचे माजी विद्यार्थी 1993 बॅचच्या वतीने आज 20 हजार शेणी, रक्षा भरणेस 10 ट्रे सेट आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचे उपस्थितीत देण्यात आले.
या बॅचच्या वतीने 100000 शेणी देण्याचे ठरले असून आजपर्यंत 50 हजार शेणी देण्यात आल्या. तसेच रक्षा भरणेस लागणारे 10 ट्रे सेट देखील देण्यात आले. आयुक्त कलशेट्टी यांनी याबाबत चांगले मत व्यक्त करत आभार देखील मानले.
यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, यूवा सेना पदाधिकारी हर्षल सूर्वे, प्रकाश भोसले, सुमंत कुलकर्णी, अमर माने,सचिन यादव, अभिजीत बकरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.