मंचर, (प्रतिनिधी) – विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवसरी बुद्रुक या विद्यालयातील तेरा विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्तीसाठी ६२ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली.
विद्या विकास मंदिर या विद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवत सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम. एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या शिष्यवृत्तीधारक प्रत्येक विद्यार्थ्याला शासनातर्फे ६० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार तसेच सारथी शिष्यवृत्तीधारक प्रत्येक विद्यार्थ्यालाही ३८ हजार ४०० रुपये दिले जाणार आहेत.
एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती पात्रधारक विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. यात गुणानुक्रमे सेजल अरगडे, अंकित बाणखिले, प्रांजल बोंबे, सोहम मोरडे, पायल भोजने,सानवी पिंगट, अदिती मैड, श्रावण भेके, सोहम गांजाळे, इशिका पवार, जानवी फल्ले, श्रद्धा कुसल आणि सिद्धी राजगुरू तसेच ६२ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, परीक्षा विभाग प्रमुख, बाबाजी चव्हाण, नवनाथ टाव्हरे, सुनिता शेळके, राधाकृष्ण कानवडे, जे. पी. त्रिवेदी आणि सचिन रोकडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि कार्यालयीन कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे, अशी माहिती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी दिली.
सर्व यशस्वी व शिष्यवृत्ती पात्रधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड .विष्णू काका हिंगे पाटील, कार्याध्यक्ष गणपतराव हिंगे पाटील, सचिव वसंतराव हिंगे पाटील, विश्वस्त शांताराम हिंगे पाटील, दीपक हिंगे पाटील, सहसचिव दीपक चवरे, अजित वाडेकर सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन हिंगे पाटील, गणेश मेंगडे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन केले. अंकुश टाव्हरे यांनी सूत्रसंचालन केले.