– स्वतंत्र ‘प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’ कक्ष सुरू
पुणे- जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली आहे. त्यासाठी “प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’ कक्ष स्थापन केला आहे. पवार हे दर महिन्याला या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत.
पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पीएमआरडीए मेट्रो, पुणे महामेट्रो, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प असे अनेक प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतले आहे. काही प्रकल्प हे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे.
परंतु करोनामुळे पुणे महापालिकेबरोबरच राज्य सरकारची ही आर्थिक कोंडी झाली आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प किमान पाच ते दहा वर्ष लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या कार्यालयात स्वतंत्र “प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’ कक्ष सुरू केला आहे.