पुणे – मागील दोन दिवसांपासून दीड हजारांखाली आलेली नव्या करोना बाधितांची संख्या बुधवारी 1,789 पर्यंत गेली. दिवसभरात 1,512 जण करोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत करोनामुळे 61 जणांचा मृत्युची नोंद झाली असून, त्यातील शहर हद्दीतील 46, तर अन्य जिल्ह्यातील 15 जणांचा समावेश आहे.
बुधवारच्या 6,463 सह आतापर्यंत तब्बल 5 लाख 89 हजार 307 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 35 हजार 818 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 15 हजार 298 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
शहरात सध्या 17,307 सक्रिय बाधित असून, त्यातील 952 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 496 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 456 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.