पुणे – पतीने एकाला उधार दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेस जबर मारहाण करण्यात आली. तीला लाकडी दांडक्याने हातावर आणी पोटावर मारहाण करुन जखमी करण्यात आले. ही लोहगाव येथील पठारे वस्तीत घडली.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी रमेश दिलीप खांदवे(26,रा.लोहगाव) व गणेश दिलीप खांदवे(28) या दोघा भावांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे
फिर्यादी 35 वर्षीय महिलेचा पती व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तीच्या पतीने आरोपींना 20 हजार रुपये उधार दिले होते. हे पैसे रमेश खांदवेने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी घेतले होते.
मात्र ते परत देण्यासाठी तो सतत टाळाटाळ करत होता. फिर्यादी हे पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेल्या होत्या. यावेळी रमेश आणी गणेशबरोबर त्यांचा वाद झाला.
यातून दोघांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.