प्रशासनावर ‘मनसे’चा आरोप
पुणे -सिंहगड रस्त्याचे काम रखडल्याने अपघात घडले असून अद्यापही घडत आहेत. या घटनांना बांधकाम विभागास जबाबदार का धरण्यात येऊ नये, असा सवाल करीत रस्त्याचे काम लवकर सुरू केले नाही तर अधिकाऱ्यांसह अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता शितल देशपांडे यांची भेट घेत या कामासंदर्भातील माहिती मागितली. तसेच काम सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते, खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष विजय मते, विधी विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. अरविंद मते तसेच हवेली उपाध्यक्ष कालिदास चावट उपस्थित होते.