सातारा : ऍपद्वारे शेतीमाल खरेदी-विक्रीचे कृषिकन्येकडून प्रात्यक्षिक

बुध (प्रतिनिधी) – राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर (ता. शिरोळ) येथे चौथ्या वर्षात शिकणाऱ्या काजल सस्ते हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सासकल (ता. फलटण) येथील शेतकऱ्यांना मार्केट यार्ड, फार्मर्स ई-मार्केट अशा शेतीविषयक मार्केटिंग ऍप्सचचे फायदे व त्यांचा वापर कसा करावा, याची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), कार्यकारी संचालक अनिल बागणे, प्राचार्य डॉ. एस. सी. पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एन. एस. पाटील व विषयतज्ज्ञ प्रा. प्राची मोरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.