छत्तीगड : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसची एका ट्रकला धडक बसली असून अपघातामध्ये 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गंजम येथून मजुरांसह गुजरातकडे बस निघाली होती होती.
Odisha CM Naveen Patnaik has announced Rs 2 lakhs each to the next of the kin of seven people, residents of Ganjam, who died in a bus accident in Raipur, Chhattisgarh. The CM has directed Minister Susanta Singh to immediately proceed to Raipur to extend necessary assistance: CMO https://t.co/shSXWrric6
— ANI (@ANI) September 5, 2020
ओडिशाच्या गंजमहून गुजरातच्या सूरत इथे मजुरांना घेऊन जाणारी बसची ट्रकला धडक बसली आहे. त्यात सात जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून घटनास्थळी पोलीस दल उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 7 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे. तर जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळावरून 7 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.